दि.26 जानेवारी 2022 रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये जल जीवन मिशन विषयी जन जागृती.
जल जीवन मिशन कार्यक्रम हा केंद्र शासनाचा महत्वकांक्षी प्रकल्प राज्यात राबविण्यात येत आहे. लोकसहभाग हा या कार्यक्रमाचा मुख्य गाभा आहे. जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत नियोजन, अंमलबजावणी व बहीर्गमन टप्प्यावर लोकांना सजग करुन लोकांमध्ये जाणीव जागृती होवून हा कार्यक्रम एक लोक चळवळ होणे अभिप्रेत आहे. याकरिता पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांनी सुचित केल्याप्रमाणे दि.26 जानेवारी 2022 रोजी आयोजित होणाऱ्या ग्रामसभेमध्ये जल जीवन मिशन बाबत ग्रामसभेमध्ये खालील मुद्यांनुसार जन जागृती करणेत येणार आहे.
1) पाणी ही मूलभूत गरज आहे. पिण्याचे पाणी उपलब्ध नसलेतर त्याचा ग्रामस्थांच्या आयुष्यावर विपरीत परिणाम होतो.
2) जल जीवन मिशन यशस्वीपणे राबविण्यात ग्रामपंचायत व ग्रामस्थांची मोठी जबाबदारी आहे. ही लोकांची योजना असून ग्रामस्थांनी योजना राबविणे, चालविणे, देखभाल दुरुस्ती करिता पुढाकार घ्यायचा आहे.
3) ग्रामस्थांना योजनेबाबत आपलेपणाची व मालकीची भावना निर्माण व्हावी याकरिता जल जीवन मिशनमध्ये लोकवर्गणची तरतूद ठेवण्यात आली आहे. लोकवर्गणीची रक्कम आर्थिक किंवा श्रमदानाच्या स्वरुपात अदा करावयाची आहे.
4) गावागावातील पाण्याचे दुर्भिक्ष्य व त्यामुळे गावकऱ्यांना होण्याऱ्या त्रासापासून मुक्ती मिळण्याकरिता जल जीवन मिशन ही सुवर्ण संधी आहे. ग्रामस्थांच्या पुढाकाराने जल जीवन मिशन अंतर्गत आदर्श योजना तयार व्हाव्यात अशाप्रकारचे संदेश ग्रामस्थांपर्यंत ग्रामसभेच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
तसेच कोविड-19 पार्श्वभूमीवर सर्व शासकीय नियमांचे पालन करुन मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.रत्नागिरी यांनी दि.26 जानेवारी 2022 रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये जल जीवन मिशन जनजागृतीपर संदेश ग्रामस्थांना देवून जनजागृती व्यापक प्रमाणातकरण्याबाबत आवाहान केले.