
चिपळुणातील रस्त्यांची दुरवस्था; उपोषणाचा इशारा
चिपळूण : शहरातून जाणार्या गुहागर-विजापूर मार्गावरील गुहागर बायपास रोड या देसाई बाजार ते लाईफ केअर हॉस्पिटलपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. दहा दिवसांत हे खड्डे न भरल्यास महामार्ग बांधकाम विभागासमोर 26 रोजी उपोषणाला बसण्याचा इशारा माजी नगरसेवक परिमल भोसले यांनी दिला
आहे. याबाबत भोसले यांनी संबंधित विभागाला पत्र दिले आहे. तसेच चिपळूण शहरातील जिप्सी कॉर्नरपासून जाणार्या रस्त्याचे काम रखडले आहे, त्यामुळे हे कामही तातडीने करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. गुहागर-विजापूर मार्ग चिपळूण शहरातून न्यायचा की बायपास रोडवरुन या वादात या रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. देसाई बाजारपासून ते अगदी लाईफकेअर हॉस्पिटलपर्यंत या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.
www.konkantoday.com