चिखलगाव परिसरात खैराची तोड करणाऱ्यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले

दापोली : तालुक्यातील चिखलगाव – मळे येथील जंगलमय भागातील खैर झाडांची तोड होत होती. दाभोळ पोलिस ठाण्याच्या प्रभारी पूजा हिरेमठ व स्टाफसह जंगलमय भागात पेट्रोलिंग करीत असताना तिघेजण वृक्षतोड करताना आढळून आले. पोलिसांनी तिघांना पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले.
विजय सुदेश येलवे (वय 27 वर्षे, रा.आगरवायंगणी ता.दापोली), राजेंद्र पांडुरंग तेलप ( वय 45 , रा. मळे , ता. दापोली), अशोक गंगाराम करंबेळे , रा.आगरवायंगणी मधलीवाडी , ता.दापोली) हे खैराची लाकडे तोडून नेत असताना संशयास्पदरित्या हत्यारांसह मिळून आले. त्यांना 25,000 किमतीच्या खैर लाकडाच्या मुद्देमालासह वनपाल दापोली यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button