
ही चिलखत काढून मैदानात या. नाय मातीत गाडलं, नाय लोळवलं तर नाव सांगणार नाही, -खासदार संजय राऊत यांचं भाजपाला जाहीर आव्हान
शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २५ युतीत सडली असा पुनरुच्चार केला. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता थेट भाजपलाच आव्हान दिलं आहे.ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स ही त्यांची चिलखतं आहेत. ही चिलखत काढून मैदानात या. नाय मातीत गाडलं, नाय लोळवलं तर नाव सांगणार नाही, असं आव्हानच संजय राऊत यांनी दिलं आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना हे आव्हान दिलं. ईडी, सीबीआय आणि इन्कम टॅक्स ही भाजपची शस्त्रं असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. याकडेही त्यांचं लक्ष वेधण्यात आलं. त्यावर राऊत यांनी भाजपला ओपन चॅलेंजच दिलं. अंगावरती वर्दी असेल पोलिसांच्या तर कुणाच्याही अंगावर जात असतो. बेकायदेशीर कामे करत असतात, आपण सिनेमात अशा प्रकारचे दृश्य पाहत असतो. तशी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स ही त्यांची चिलखत आहेत. ही चिलखत घालून ते लढत असतात. हिंमत असेल तर चिलखत काढून मैदानात या. नाय मातीत गाडलं, नाय लोळवलं तर आम्ही नाव सांगणार नाही, अशी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. त्याच्याशी आम्ही ठाम आहोत, असं राऊत म्हणाले.
www.konkantoday.com