
सामाजिक कार्यासाठी ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांना ‘गात जा अभंग’ पुरस्कार
चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि अरविंद जाधव अपरान्त संशोधन केंद्राच्या वतीने २६ जानेवारी रोजी सायंकाळी ५.०० वाजता वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात कवीवर्य द्वारकनाथ शेंडे पुरस्कार प्रदान सोहोळा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या पुरस्कार प्रदान सोहोळ्यात सामाजिक कार्यासाठी सतीश कामत यांना ‘गात जा अभंग’ पुरस्कार, ‘हरविलेल्या कवितांची वही’ काव्यसंग्रहासाठी संदीप पाटील यांना ‘मृदंगी’ पुरस्कार आणि ‘लक्ष्मी’ कथासंग्रहासाठी सौ. नीला नातू यांना ‘मनबोली’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. कोविडचे सर्व नियम पाळून संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमास साहित्य प्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन ‘लोटिस्मा’ अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कोषाध्यक्ष विनायक ओक आणि कार्यवाह धनंजय चितळे यांनी केले आहे.
www.konkantoday.com