
वारा वाढल्याने समुद्र खवळला; नौका किनार्यावर
रत्नागिरी : पावसाच्या इशार्याने समुद्रात वारेही वेगाने वाहू लागल्याने समुद्र खवळला आहे. नौका बंदरातच आश्रयाला नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. रविवारी दिवभर समुद्र खवळला होता. अशा वातावरणात मासेमारी करणे धोकादायक असल्याने परजिल्ह्यातील मासेमारी नौका आश्रयाला भगवती बंदर, मिरकरवाडा येथे दाखल झाल्या आहेत. पाकिस्तानातून गुजरात, मुंबईहून आलेल्या धुळीच्या वादळाचा परिणाम रत्नागिरीतही जाणवला. यामुळे रविवारी वातावरणातील दृष्यमानता कमी झाली होती.