ज्याची बायको पळून जाते, त्याचे नाव मोदी ठरते,” काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे परत वादग्रस्त विधान
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत सुरु असलेली वादग्रस्त वक्तव्याची मालिका सुरुच आहे मोदीला मारु शकतो, शिव्या देऊ शकतो’, या नानांच्या वक्तव्यानंतर भाजपकडून राज्यभरात आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा नाना पटोले यांनी मोदींबाबत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा भाजप नेते आक्रमक झाले आहे. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं, तो पुतळाही जाळण्यात आला.
नाना पटोले यांनी रविवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना “ज्याची बायको पळून जाते, त्याचे नाव मोदी ठरते,” असं आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर भाजप नेत्यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे आमदार आणि राज्याचे माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात पटोले यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याविरोधात ‘जोडे मारो’ आंदोलन केलं. त्यांच्याविरोधात तातडीने कारवाई न झाल्यास राज्यभरात भाजप कार्यकर्त्यांकडून पुन्हा एकदा तीव्र निषेध आंदोलनं करण्यात येणार असल्याचं बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं.
www.konkantoday.com