चिपळूण शहरात गोवळकोट येथे फुगे फुगविणार्या सिलिंडरचा स्फोट, एक जण जखमी
चिपळूण शहरातील गोवळकोट भागात फुगे भरण्यासाठी वापरण्यात येणार्या नायट्रोजन गॅस सिलिंडरचा स्फोट स्फोट झाल्याने झालेल्या अपघातात एक जण जखमी झाला असून त्याला खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आला आहे हा प्रकार काल सायंकाळी उशिरा घडला गोवळकोट परिसरात काही परप्रांतीय राहतात मुलांच्या खेळण्यासाठी विविध रंगांचे फुगे फुगवून ते विक्री करण्याचा व्यवसाय करतात फुगे फुगविण्यासाठी नायट्रोजन गॅस सिलिंडरचा वापर केला जातो त्यापैकी एका गॅस सिलिंडरचा व्हॉल्व्ह तुटल्याने सिलिंडरचा मोठा स्फोट झाला या स्फोटात फुगे विक्रेता जखमी झाला हा स्फोट एवढा मोठा होता की पत्र्याचे शेडही फाडून सिलिंडर इमारतीच्या तिसर्या मजल्यापर्यंत वर उडाला या स्फोटामुळे आजूबाजूला घबराट निर्माण झाली या प्रकारा नंतर चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली
www.konkantoday.com