गायक रोहित राऊत व गायिका जुईली जोगळेकर हे लग्नबंधनात अडकले

सारेगमप लिटिल चॅम्प्समधून प्रसिद्ध झालेला गायक रोहित राऊत व गायिका जुईली जोगळेकर हे लग्नबंधनात अडकले आहेत. या दोघांनी पुण्यातील प्रसिद्ध ढेपेवाडा येथे लग्नगाठ बांधली.

गेल्या काही दिवसांपासून रोहित व जुईलीच्या लग्नाच्या विधी सुरू आहेत.प्रथम ग्रहमख, साखरपुडा, संगीत, मेहेंदी, हळद अशा सर्व कार्यक्रमांचे त्यांचे फोटो व्हायरल झाले आहेत. रोहित व जुईलीची इंडस्ट्रीतील खास मैत्रीण मिताली मयेकर हिने या सर्व कार्यक्रमांना हजेरी लावली होती.

रोहित व जुईली हे एकमेकांना गेल्या अनेक वर्षांपासून डेट करत आहेत. ते सतत एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button