खेड तालुक्यातील चिरणी नदीच्या गाळ उपशास प्रारंभ
खेड : तालुक्यातील चिरणी गावातून वाहणार्या नदीचे खोलीकरण होणार आहे. चिरणी गावामध्ये शनिवारी नदी पुनर्जीवन आणि रुंदीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. नाम फाउंडेशन आणि चिरणीचे ग्रामस्थ यांच्या लोकसहभागातून गाळ उपसण्याचे काम शनिवारपासून सुरू झाले. या कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी खेडच्या प्रांताधिकारी राजश्री मोरे, नाम फाउंडेशनचे समीर जानवलकर, शहानवाज शहा, महेंद्र कासेकर, चिरणीचे सरपंच पांडुरंग जानकर, अविनाश आंब्रे उपसरपंच, योगेश आंब्रे ग्रामपंचायत सदस्य, मोहन आंब्रे माजी उपसभापती खेड पंचायत समिती, विष्णू आंब्रे, संजय आंब्रे, जितेंद्र आंब्रे, मंगेश आंब्रे, जगदीश आंब्रे, राजेश आंब्रे, किशोर आंब्रे, शांताराम आंब्रे, निलेश आंब्रे, संजय आंब्रे, सचिन आंब्रे, विजय आंब्रे आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com