
अशी कितीही पत्र द्या, माझ्या भूमिकेत बदल होणार नाही. कालही विद्यार्थ्यांसोबत होतो, आजही आहे आणि उद्याही राहणार -उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
करोनामुळे राज्यातील परिस्थिती परीक्षा घेण्यासारखी नसल्याची भूमिका राज्य सरकारकडून मांडली जात आहे. तर दुसरीकडे परीक्षा घेण्यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगानं नवीन नियमावली जारी केली आहे. त्यातच विरोधी बाकांवरील भाजपाकडूनही परीक्षा घेण्यासंदर्भात मागणी केली जात आहे. दरम्यान, उदय सामंत यांना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पदावरून हटवण्यात यावं, अशी मागणी करणारं पत्र अतुल भातखळकर यांनी राज्यपालांना पाठवलं होतं. त्या पत्रावरून उदय सामंत यांनी भातखळकर यांना टोला लगावला आहे.
राज्यातील विद्यापिठीय परीक्षा न घेण्याच्या निर्णयांचा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडून वारंवार पुनरुच्चार केला जात आहेत.त्यातच सामंत यांनी राज्यातील कुलगुरूंच्या निवेदनाचा हवाला देत परीक्षा घेण्याची गरज नसल्याचं म्हटलं होतं. त्यावरून भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी थेट राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवलं. तसेच उदय सामंत यांना पदावरून दूर करावं, अशी मागणी केली.पत्रावरून उदय सामंत यांनी अतुल भातखळकर यांना टोला लगावला आहे. सामंत यांनी एक ट्विट केलं असून, “अशी कितीही पत्र द्या, माझ्या भूमिकेत बदल होणार नाही. कालही विद्यार्थ्यांसोबत होतो, आजही आहे आणि उद्याही राहणार. अतुलजींना शुभेच्छा,” असं म्हणत सामंत यांनी भातखळकरांना टोला लगावला आहे
www.konkantoday.com