सह्याद्री जीवनगौरव पुरस्कार २०२२ने रत्नदुर्ग माउंटेनिअर्सला सन्मानित
सह्याद्री जीवनगौरव पुरस्कार २०२२ने रत्नदुर्ग माउंटेनिअर्सला सन्मानित करण्यात आले. गेली सव्वीस वर्षे कार्यरत असणाऱ्या व गिर्यारोहणसोबत समाजोपयोगी कामात व आपत्कालीन परिस्थितीत सहभागी असणाऱ्या रत्नदुर्गचे सर्वांनीच भरभरून कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील व सह्याद्री शिक्षणसंस्थेचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते रत्नदुर्ग माउंटेनिअर्सला सन्मानित करण्यात आले.
हा सन्मान स्वीकारण्यासाठी अध्यक्ष वीरेंद्र वणजू व उपाध्यक्षा नेत्रा राजेशिर्के, पराग सुर्वे, जितेंद्र शिंदे, किशोर सावंत आदी उपस्थित होते. या सर्व सदस्यांनी सह्याद्री शिक्षणसंस्थेमधील मुलांनी साकारलेल्या निरनिराळ्या दुर्मिळ शिल्पांचे कलाकौशल्याचे भरभरून कौतुक केले. मनोगत व्यक्त करताना वणजू यांनी संस्थेच्या छोट्या-मोठ्या कामगिरीतसोबत पर्यटनदृष्ट्या चाललेल्या छोट्या-मोठ्या धडपडी व त्याला मिळणारे शासकीय पाठबळ याचा उल्लेख करत सह्याद्री शिक्षणसंस्थेने दिलेल्या या जीवनगौरव पुरस्काराबद्दल संस्थेचे व आमदार शेखर निकम यांचे मनःपूर्वक आभार मानले.
www.konkantoday.com