
रत्नागिरी शहर अधिक हिरवेगार होणार
रस्त्याच्या दुतर्फा आणि दुभाजकांवर ही हिरवीगार झाडे आणि त्यातून धावणारी वाहने असे चित्र रत्नागिरीकरांना लवकरच पहायला मिळणार आहे. रत्नागिरीत सिग्नेचर रोड दोन टप्प्यात साकारण्यात येणार असून पहिल्या टप्यात साळवीस्टॉप ते मांडवीपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात येणार आहे. तसेच दुभाजकांवरही झाडांची लागवड करण्यात येणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्यात हातखंबा ते साळवीस्टॉप दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात येणार आहेत. हातखंबा ते मांडवीदरम्यानचा रस्ता सिग्नेचर रोड म्हणून ओळखला जाणार आहे. आजूबाजूला हिरवीगार वृक्षवल्ली आणि त्यामधून जाणारा रस्ता रत्नागिरीची नवी ओळख ठरणार आहे. सीएसआरमधील निधीतून रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावण्यात येणार आहेत.
त्याकरीता तज्ञ मंडळींचे मार्गदर्शन घेतले जाणार आहे.
www.konkantoday.com