
रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारपासून शाळा सुरू करण्याबाबत अद्याप आदेश नाहीत ?
राज्यात सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे मात्र प्रत्येक जिल्ह्यातील काराेनाची परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत शासनाने सोमवारपासून शाळा सुरू करण्याचा आदेश दिला असला तरी अद्याप रत्नागिरी जिल्ह्यातील शाळा सोमवारपासून सुरू करण्याबाबत शाळांना आदेश अद्याप तरी आलेले नाहीत रत्नागिरी जिह्यात करोना रुग्ण मिळत आहेत याचाही विचार करून प्रशासनामार्फत निर्णय जाहीर होणार आहे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब हे २६ तारखेला रत्नागिरीत येत असून ते स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून निर्णय जाहीर करतील अशी अपेक्षा आहे त्यामुळे जिल्ह्यातील शाळा सव्वीस तारखेनंतर सुरू होण्याची शक्यता सध्या तरी दिसत आहे
www.konkantoday.com