महाआघाडी शासनाची मानसिकता मुरदाड बेपर्वा सरंजामशाहीसारखी

महाआघाडी शासनाच्या कार्यकाळात जनतेचे अनन्वित हाल सुरू आहेत. कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न, प्रशासकीय कामकाजातील घोळ, नवनवीन घोटाळ्यात अडकणारे मंत्री, मंत्रालयात न फिरणारे शासन प्रमुख,आरोग्य व्यवस्थेवर पडलेला ताण त्यातून जर्जर झालेली आरोग्य व्यवस्था,ओबीसी समाजाचे गेलेले राजकीय आरक्षण, मराठा आरक्षणाचे भिजत पडलेले घोंघडे, यातून निर्माण झालेले सामाजिक अशांत वातावरण स्वता घेतलेला कोणताही निर्णय मेहरबान उच्च न्यायालयात प्रभावीपणे टिकवू न शकलेले, सातत्याने पराभुत होणारे महाआघाडी शासन,
जनहित जोपासण्याची कार्यपद्धती विचार परिघा बाहेर
विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात अपयशी ठरलेले हे शासन या मुर्दाड शासनाची निर्मितीच मुळात विजातीय तत्वांची सांगड घालून केवळ सत्तालोलुपतेतून निर्माण झालेली असल्याने जनता व जनतेचे प्रश्न हा विषय महाआघाडी शासनाच्या विचार परिघाच्या बाहेर जातो अशी परखड टीका भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांनी भाजपा प्रमुख पदाधिकारी व निमंत्रीत कार्यकर्ते यांच्या समोर बोलताना केली.
महाआघाडी शासन काळ जनतेच्या फरफटीचा
या अकार्यक्षम शासनाचा फटका महाराष्ट्रातील जनतेला बसत आहे जनतेची प्रचंड फरफट सुरू आहे जनता असहाय्यपणे सर्व सोसत आहे. महाआघाडी शासनाचे प्रमुख घरी बसून आहेत राजकीय दायित्व नसलेले सत्ताबाह्यकेंद्र शासन चालवत आहे. दीर्घकाळ अध्यक्ष नसलेली विधानसभा, मंत्रालयात न फिरकणारे मुख्यमंत्री ,प्रश्नांची जाण नसलेले घोटाळे बहाद्दर मंत्री, या दुष्टचक्रात महाराष्ट्रातील जनता अडकली आहे.
संप एसटी चा फरफट आम जनतेची
गेले दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. धाकदपटशा दाखवूनही संप सुरूच आहे. शासनात विलीनीकरण हा मुद्दा निकराचा करून एसटी कर्मचारी धैर्याने लढत आहेत.मात्र महाराष्ट्र शासनाला याचे सोयरसुतक नाही.एसटी बंद असल्याने राज्यातील व्यवसाय उद्योग अडचणीत आले. आहेत गोरगरिबाला इच्छितस्थळी पोहोचणं अशक्य झाला आहे. नोकरदार वर्ग विद्यार्थी वर्ग एसटी सेवा नसल्याने खूप अडचणीत आहेत. गावा गावात एसटी सेवा नसल्याने नित्य गरजेच्या वस्तू मिळणे अशक्य झाले आहे. शहरात येणारा ग्रामीण वर्ग एसटीअभावी शहरात येऊ शकत नाही त्यामुळे शहरातील व्यापार थंडावला आहे. अर्थचक्र मंदावले आहे. गरिबी वाढत आहे.आरोग्य सुविधांपासून ग्रामस्थ दुरावले आहेत.विद्यार्थी वर्ग नोकरदार वर्ग यांचे अनन्वित हाल सुरू आहेत. अशी अवस्था होऊन दोन महिन्यांपेक्षा अधिक कालखंड लोटला आहे,.
अस्तीत्वहीन अकार्यक्षम शासन
तरी शासन आपले अस्तित्व दाखवत नाही.एसटी संप मिटण्याची चिन्हे नाहीत. शासनाला जनतेचे हाल दिसणे इतकी संवेदनशील दृष्ठी राहिलेली नाही.दोन महिन्यांपेक्षा संप चालू असूनही माननीय मुख्यमंत्री महोदय याबाबत चकार शब्द उच्चारत नाहीत.ही उदासीनता कोणत्या स्थराची म्हणावी की आपल्या बगलबच्च्यांचा टूरिस्ट वाहनांचा धंदा तेजीत यावा त्याला एसटीची स्पर्धा करावी लागू नये यासाठी संप चिघळवण्याचे कुटिल कारस्थान नाही ना असा प्रश्न पडत आहे.
महाआघाडी शासनाने सत्ता सोडावी हे जनमानस
महाआघाडी शासन हे संवेदनाशून्य शासन आहे जनहिताच्या सेवा दोन दोन महिने बंद असूनही महाआघाडी शासन शांत आहे जनतेला वाऱ्यावर सोडून शासनाचे घटक स्वार्थी हेतू पूर्ण करण्यात मश्गुल आहेत आता नागरिकांच्या सहनशक्तीचा अंत होत आहे महाआघाडी शासनाला शासन चालवता येत नसल्याने या शासनकर्त्यांनी सत्ता पदावरून दूर व्हावे असे जनमानस आहे अशी खरमरीत प्रतिक्रिया भाजपा जिल्हाध्यक्ष अँड.दीपक पटवर्धन यांनी दिली