
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या लेखी परीक्षा या ऑफलाईनच
राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या लेखी परीक्षा या ऑफलाईनच होतील, त्यात कोणताही तुर्तास बदल होणार नसल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दहावी-बारावीच्या परीक्षांचा अभ्यास आणि त्याची तयारी करावी असे आवाहनही त्यांनी राज्यातील विद्यार्थ्यांना केले.
राज्यातील काही विथ्यार्थी आणि पालक संघटनांकडून दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी केली जात आहे.त्या पार्श्वभूमीवर विचारले असता गायकवाड म्हणाल्या की, कोरेोना आणि त्याचा प्रादुर्भाव राज्यात कमी होत असल्याने लवकरच शाळा सुरू केल्या जाणार आहेत. तर दुसरीकडे दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण होऊन त्यासाठीची तयारी करता यावी म्हणून शालेय शिक्षण विभागाकडून वेळोवेळी खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे या दोन्ही वर्गांच्या तोंडी, प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा या ऑफलाईनच होतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
www.konkantoday.com