राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय आंबव देवरूख मध्ये शिकणाऱ्या तीन विद्यार्थ्यांनी बनवली बायो हायब्रिड’ कार
राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय आंबव देवरूख मध्ये शिकणारे तीन विद्यार्थी अक्षय प्रभाकर शिखरे, सुरज दिनेश वेद्रे, सुशांत विजय शिंदे यांनी एक आगळीवेगळी कार बनवली आहे.ही नुसती कार नाही तर इलेक्ट्रिक आणि पँडल वापरून ती चालवता येते. या कारला त्यांनी ‘बायो हायब्रिड’ असे नाव दिले आहे. त्यांनी दिलेल्या नावाप्रमाणेच ही बायो हायब्रिड कार आहे.
इंधनाचे वाढते दर पाहता इलेक्ट्रिक वाहन ही काळाची गरज बनली आहे. इलेक्ट्रिक कार प्रदूषण रोखण्यासोबतच आरोग्याच्या दृष्टीनेही चांगल्या आहेत. त्याचाच विचार करून या विद्यार्थ्यांनी ही कार बनवली आहे. कारमधील पँडलच्या वापरामुळे आरोग्य चांगले राखण्यास मदत होणार आहे. तर इलेक्ट्रिक वापराने प्रदूषण टाळता येणार आहे. ही कार आकाराने इतर कारच्या तुलनेत छोटी आहे. त्यामुळे ती कमी जागा व्यापली पाहिजे.
30 ते 35 किमीची मायलेज देणारी ही कार 20 केएमपीएचच्या वेगाने धावते. ही गाडी 300 ते 350 किलो वजन घेऊन सहज चालू शकते. विशेष म्हणजे ही कार अवघ्या 45 हजार रुपयांमध्ये बनवण्यात आली आहे. ही कार मंगलमूर्ती ॲटो गॅरेजचे मालक दिनेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बनवण्यात आली आहे. लिथियम आयन बॅटरी आणि मोटर जास्त क्षमतेची वापरली तर ही गाड़ी माइलेज, वेग यामध्ये सहज वाढ होऊ शकते असे त्यांचे म्हणणे आहे. भविष्यामध्ये सौरऊर्जा व डायनामो लावल्यास ऑटो चार्जिंगचे फिचर्सही कारमध्ये देता येऊ शकते, असे या विद्यार्थांनी सांगितले.
www.konkantoday.com