
येत्या सोमवारपासून शाळा, महाविद्यालये सुरु होणार?
आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता
सध्या कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाल्यामुळे दिलासा व्यक्त केला जातोय. कोरोना रुग्णांची संख्या घटल्यामुळे आता राज्य सरकारने २० दिवसांपासून बंद असलेली शाळा- महाविद्यालये पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारपासून शाळा, महाविद्यालये सुरु होण्याची शक्यता आहे
विशेष म्हणजे शाळा सुरु करण्याच्या या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील अनुकूल असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाचा संसर्ग आणि राज्यातील परिस्थिती पाहून बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलीये. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com