मुंबई विद्यापीठ रत्नागिरी उपकेंद्रामार्फत 13 विद्यार्थ्यांची इंटर्नशिप पूर्ण
रत्नागिरी-चरित्रकार पद्मभूषण धनंजय कीर उपकेंद्र मुंबई विद्यापीठ रत्नागिरी यांच्या एमएससीच्या 13 विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप पूर्ण केलीय… रत्नागिरी एमआयडीसीच्या दीपक गद्रे यांच्या गद्रे मरीन एक्पोर्ट प्रायव्हेट लिमीटेड आणि सुयोग एँक्वारियम रत्नागिरी येथे इनटर्नशीप पूर्ण केलीय…एमएससी प्राणीशास्त्र विभागाच्या 9 आणि एमआयसी पर्यावरणशास्त्र विभागाच्या 4 मुलांनी ही इंटर्नशिप पूर्ण केलीय. गद्रे कंपनीचे प्रमुख दीपक गद्रे तर सुयोग एँक्वारियमच्या सुयोग भागवत यांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय.
गद्रे कंपनीत एमएससी प्राणीशास्त्रच्या श्रेया राऊत, गौरी केतकर, प्रणव सोनी, नेहा जोईल यांनी तर पर्यावरणशास्त्रच्या सनम दाते, ऋजुदा जाधव, गजानन खैरनार आणि वैष्णवी नार्वेकर यांनी इंटर्नशिप पूर्ण केलीय तर सुयोग एँक्वारियममध्ये प्राणीशास्त्र विभागाच्या शितल फटकरे, मयुरी घव्हाळी, सोनाली मोहिते आणि श्रावणी राजपूत यांनी इंटर्नशीपपूर्ण केलंय.. 31 डिसेंबर 2021 ते 7 जानेवारी 2022 दरम्यान ही इंटर्नशीप या 13 विद्यार्थ्यांनी पूर्ण केलीय. या विद्यार्थ्यांना रत्नागिरी उपकेंद्राचे प्रमुख डॉ किशोर सुखटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्राणीशास्त्र विभागाच्या प्राध्यापक तैफीन तौसीफ पठाण व पर्यावरणश्स्त्रचे प्राध्यापक निलेश रोकडे यांनी मार्गदर्शन केले…
www.konkantoday.com