
अतिक्रमण विरोधी मोहिमेचे पडसाद, देवरूखमधील व्यापारी दुकाने बंद करून नगर पंचायतीवर धडकले
देवरूख : नगरपंचायतीने बुधवारी राबविलेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेचे पडसाद गुरुवारी देवरूखमध्ये उमटले. शहरातील ९० टक्के व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत या कारवाईचा जाहीर निषेध केला आहे.
काही वेळापूर्वी याबाबतीत जाब विचारण्यासाठी शहरातील बहुतांश व्यापारी नगरपंचायत कार्यालयावर धडकले आता न. पं. कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, बुधवारी केलेली कारवाई ही सरसकट करण्यात आली असून यात व्यापाऱ्यांना नाहक त्रास देण्यात आला आहे, असा आरोप व्यापारी करत आहेत. गुरुवारी व्यापारी नगर पंचायतीवर धडकल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले.
www.konkantoday.com