सायकलच्या प्रेमात पडलेल्या दोघांची ७२ वर्षीही सायकल सफरी
सेवानिवृत्तीनंतर सायकलच्या प्रेमात पडलेल्या ७२ वर्षाच्या दोघांनी सायकल सफरी सुरू केल्या. नोव्हेंबरमध्ये चार दिवसांत तीनशे किलोमीटरचा टप्पा पार केल्यावर त्यांनी मिशन कोकण सुरू केले. मजल दरमजल करत त्यांनी सहाशे किलोमीटरचा टप्पा पार केल्यावर त्यांनी मिशन कोकण सुरू केले. मजल दरमजल करत त्यांनी सहाशे किलोमीटरचा टप्पा ओलांडून रत्नागिरीत प्रवेश केला. युवकांनी व्यायामाकडे वळले पाहिजे. सायकलिंग हा सर्वात उपयुक्त व्यायाम आहे, असा संदेश देत ते सायकलपटू कोल्हापूरला रवाना झाले. मुकुंद कडूसकर आणि जयंत रिसबूड अशी या दोघा सायकलपटूंची नावे आहेत. www.konkantoday.com