
साथीच्या काळात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय अयोग्यच -जागतिक बँकेच्या शिक्षण विभागाचे संचालक जैमी सावेंद्र
शाळा सुरू ठेवल्याने कोरोनाचा संसर्ग वाढतो, असे कोणतेही शास्त्रीय पुरावे मिळालेले नाहीत. त्यामुळे साथीच्या काळात शाळा बंद ठेवण्याचा निर्णय अयोग्यच आहे, असे जागतिक बँकेच्या शिक्षण विभागाचे संचालक जैमी सावेंद्र यांनी म्हटले आहे.साथीमध्ये शाळा बंद ठेवणे हा अगदी शेवटचा पर्याय आहे. कोरोनाचा जगातील शिक्षणव्यवस्थेला फटका बसला असल्याचे ते म्हणाले.
www.konkantoday.com