रत्नागिरी जिल्ह्यात मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम अंमलबजावणी सुरू ,पालकांना परवाना नसताना मुलांच्या हाती वाहन देणे पडणार महाग

महाराष्ट्र शासनाने मोटार वाहन ( सुधारणा ) अधिनियम 2019 ची अंमलबजावणी करण्याबाबत दिनांक 01 डिसेंबर 2021 रोजी अधिसुचना काढली असून या सुधारित अधिनियमा नुसार ई चलान प्रणालीमध्ये दंड रक्कम दिनांक 11/12/2021 रोजी मध्यरात्रीपासून अद्ययावत करण्यात आली आहे. त्यामुळे मोटार वाहन ( सुधारणा ) अधिनियम 2019 ई चलान मशीनमध्ये अद्ययावत झाल्यावर सदर अधिसुचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे सुधारित वाहतूक गुन्ह्याच्या दंडाची आकारणी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकाचवेळी पोलीसांकडून सुरू करण्यात आलेली आहे.

नवीन मोटार वाहन ( सुधारणा ) अधिनियम 2019 नुसार वाहतुकीचे नियम मोडणा-या वाहन चालक / मालक यांच्यावरील दंडात्मक कारवाईमध्ये वाढ झालीअसून याआधी कमीत कमी 200 रूपये असलेले तडजोड शुल्क नवीन अधिनियमानुसार पहिल्या अपराधासाठी रूपये 500 आणि दुस-या व त्यापुढील तशाच प्रकारे केलेल्या अपराधासाठी 1500 करण्यात आले आहे. नवीन अधिनियमानुसार विना हेल्मेट व दुचाकीवरुन ट्रीपल सीट या अपराधासाठी अनुक्रमे रू. 500/- व रू.1000/- दंड असून याशिवाय संबंधित वाहन चालक यांचा चालक परवाना 03 महिन्यांसाठी रद्द करण्याबाबतची तरतूद आहे. याशिवाय वाहन चालवताना मोबाईल फोनचा वापर करणे, रेड सिग्नल जंपिंग, दारू पिऊन वाहन चालवणे, अति वेगाने वाहन चालवणे, अवैध प्रवासी वाहतूक आणि माल वाहतूकीच्या वाहनातून प्रवासी वाहतूक यासारख्या अपराधासाठीही संबंधित वाहन चालक यांचा परवाना रद्द करण्याबाबत पोलीस विभागाकडून संबंधित विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात येतात.

याशिवाय चुकीच्या दिशेने वाहन चालवणे (Wrong Side Driving ), धोकादायक रित्या वाहन चालवणे ( Dangerous Driving ), मद्यप्राशन करून वाहन चालवणे (Drunk & Drive) तसेच नो पार्किंग क्षेत्रात वाहन लावणे यासारखे अपराध विना तडजोडीचे करण्यात आलेले असून अशा वाहन चालकांविरूध्द न्यायालयात खटले पाठविण्यात येणार आहेत.

दिनांक 12 डिसेंबर 2021 पासून सुधारित वाहतूक अधिनियमानुसार अंमलबजावणी पोलीसांकडून करण्यात आलेली असून रत्नागिरी जिल्ह्यातील दि. 12/12/2021 ते 12/01/2022 या कालावधीत केलेल्या महत्वाच्या हेडनिहाय कारवाईची माहिती खालील प्रमाणे आहे

अपराध प्रकार एकूण केसेस दंड

01) विना हेल्मेट 1076 538000
02) विना सिटबेल्ट 780 169300
03) मोबाईल फोनचा वापर 18 20000
04) विना परवाना 43 215000
05) परवाना नसलेल्या व्यक्तीस
वाहन चालवण्यास देणे 20 100000
06) विना विमा 29 58000
07) फॅन्सी नंबर प्लेट 374 193500
08) डार्क फिल्म/ ग्लास 71 37500
09) वाहतुकीस अडथळा 748 388000
10) नो एंट्री 327 165500
11) ट्रीपल सीट 62 62000
12) इतर केसेस 4618 2389400
‐——————————————————————————–

एकूण केसेस 8192 43,39,700

*नवीन अधिनियमानुसार वाहन परवाना नसताना वाहन चालविणे यासाठी वाहन चालविणा-या व्यक्तीस रू.5000/- आणि परवाना नसलेल्या व्यक्तीस आपले वाहन चालविण्यासाठी देणे यासाठी संबंधित वाहन मालक यांना रू.5000/- अशी दंडात्मक तरतूद आहे. तरी सर्वांनी विशेषतः पालकांनी याची कृपया नोंद घ्यावी व वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले जातील याची दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे*.

www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button