भाजपचे आमदार आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड याच्या घराजवळ २ संशयित तरुणांना बंदुकीसह पकडल्याने खळबळ
मुंबईमध्ये भाजपचे आमदार आणि भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाडयांच्या घराजवळ २ संशयित तरुणांना पकडण्यात आले आहे. या दोन्ही तरुणांकडे 3 मोबाईल आणि बंदूक देखील मिळाल्या आहेत्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. प्रसाद लाड यांच्या घराच्या बाजूला या 2 संशयित तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे.
धक्कादायक म्हणजे, या दोन्ही तरुणांकडे ३ मोबाईल फोन सापडले आहे. त्यांची तपासणी केली असता त्यांच्या बंदूक सापडून आली आहे. यातील एक तरुणाचे आधारकार्ड समोर आले आहे. त्यावर मिठ्ठू असे नाव आहे.
तो उत्तर प्रदेशमधील राहणार आहे. पोलिसांनी या दोन्ही तरुणाला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे बंदूक कुठून आल्यात, ते इथं काय करण्यासाठी आले होते, याचा तपास पोलीस करत आहेत
www.konkantoday.com