कामाचं अपयश लुंगीमागं लपवण्याचा प्रयत्न , खासदार उदयनराजे यांच्यावर आमदार शिवेंद्रराजे यांची टीका
खासदार उदयनराजे हे वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असतात.
साताऱ्यातल्या दोन राजेंमधला जिव्हाळा आणि दोन्ही राजेंमधलं वैर अख्ख्या महाराष्ट्राला सर्वश्रूत आहे.
आता त्याच्या पुढच्या अंकाला सुरुवात झालीय. रविवारी खासदार उदयनराजेंनी पुष्पा चित्रपटातल्या एका गाण्यावर लुंगी घालून डान्स केला होता. त्यावर आता आमदार शिवेंद्रराजेंनी टीका केलीय. कामाचं अपयश लुंगीमागं लपवण्याचा प्रयत्न केला जात असून सातारकरांनी याकडे मनोरंजन म्हणून पाहावं असं आमदार शिवेंद्रराजे म्हणाले.
आमदार उदयनराजे म्हणाले की, “साताऱ्यात आता निवडणुका येत आहेत. त्यामुळे या पुढे खासदारांचे असे अनेक डान्स लोकांना पहायला मिळणार नाही. त्यांनी काही कामच केलं नसून पाच वर्षांच्या कामाचं अपयश या लुंगीमागे लपवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. नगरपालिका निवडणुका तोंडावर असल्यामुळे हा सगळा प्रकार असून सातारकरांनी उदयनराजेंच्या या कृत्याकडे मनोरंजन म्हणून पहावं.”
सध्या देशभर ‘पुष्पा’ चित्रपट चांगलाच गाजतोय आणि याच चित्रपटाचा प्रभाव भाजपचे खासदार उदयनराजेंवरही दिसून आला. साताऱ्यातून फेरफटका मारत असताना चित्रपटातील नायक पुष्पराज सारखा पेहराव देखील उदयनराजेंनी केला होता. एवढंच नव्हे तर या चित्रपटातील सामी या गाण्यावर काही कार्यकर्त्यांसह साताऱ्यातील सेल्फी पाँईंटवर डान्सही केला होता. तसेच त्यांनी त्यांची कॉलर उडवण्याची स्टाईलही मारली. त्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
www.konkantoday.com