रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील 100 फुटी राष्ट्र ध्वज 26 जानेवारीपूर्वी पुन्हा फडकवण्यात यावा!
गाव विकास समिती,रत्नागिरी जिल्हा संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
रत्नागिरी:-रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात 100 फूट उंच राष्ट्र ध्वज स्तंभ उभारण्यात आला आहे.हा ध्वज स्तंभ रत्नागिरी जिल्ह्याचा गौरव आहे.मात्र मागील काही महिने या ध्वज स्तंभावर भारतीय राष्ट्रध्वज तिरंगा फडकत नसल्याचे लक्षात आले असून राष्ट्रीय ध्वज या 100 फुटी ध्वज स्तंभावरून काढून ठेवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.तरी याठिकाणी प्रजासत्ताक दीना पूर्वी राष्ट्र ध्वज फडकवण्यात यावा अशी मागणी गाव विकास समितीचे सरचिटणीस डॉ मंगेश कांगणे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात गाव विकास समितीच्या वतीने नमूद करण्यात आले आहे की,आमची आपणास विनंती आहे,26 जानेवारी प्रजासत्ताक दिना पूर्वी या 100 फुटी उंच ध्वज स्तंभावर आपला राष्ट्रध्वज फडकेल यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करावेत.हा झेंडा फडकवल्यानंतर तो मधल्या काळात का काढून ठेवण्यात आला याची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही गाव विकास समितीने केली आहे.
तिरंगा हा संपूर्ण देश वासीयांचा अभिमान आहे.रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय येथे 100 फुटी उंच ध्वज स्तंभावर फडकणारा भारतीय तिरंगा पुन्हा दिमाखात फडकवला जावा अशी विनंती गाव विकास समितीचेडॉ.मंगेश कांगणे,सरचिटणीसश्यामकर्ण भोपळकर, जिल्हाध्यक्षमुझम्मील काझी,जिल्हा उपाध्यक्षमनोज घुग,जिल्हा संघटकसुकांत पाडाळकर,रत्नागिरी तालुका संघटकअमित गमरे,संगमेश्वर कार्याध्यक्षप्रशांत घुग, तालुका उपाध्यक्षदैवत पवार,विद्यार्थी संघटना यांनी ईमेलद्वारे पाठवलेल्या निवेदनातुन केली आहे.
www.konkantoday.com