उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या मंत्रालयासमोरील बंगल्याच्या बाहेर भाजप युवा मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांची रांगोळी काढून निदर्शने
उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या बंगल्याच्या बाहेर भाजप युवा मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांनी सकाळी पाच वाजल्यापासून आंदोलन सुरु केलं.विद्यापीठ कायद्याविरोधात भाजप युवा मोर्चाच्या महिला कार्यकर्त्यांनी पहाटे पाच वाजता मंत्रालयासमोरील मंत्री उदय सामंत यांच्या घराबाहेर रांगोळी काढून निदर्शनं केली. यावेळी पोस्टरवरून पोलीस आणि भाजप महिला कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी महिलांनी महाराष्ट्र सरकारविरोधात घोषणाही दिल्या. आंदोलनादरम्यान भाजप युवा महिला मोर्चाच्या काही महिला कार्यकर्त्यांना मरीन ड्राइव्ह पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महिला कार्यकर्त्यांनी राज्य सरकारला धमकी देत विद्यापीठ कायद्यात बदल न केल्यास आगामी काळात महाविकास आघाडी सरकारमधील प्रत्येक आमदार, खासदार, मंत्री यांच्या घराबाहेर आम्ही आंदोलन करु, असं सांगितलं.मात्र उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे गेले दोन दिवस सिंधुदुर्ग व रत्नागिरीच्या दौर्यावर आहेत
www.konkantoday.com