
सावंतवाडी नगरपालिकेने मिळवले मासेमारीतून तीन लाखाचे उत्पन्न
नगर परिषदेचे काम शहराच्या विकासाचे असते मात्र असलेल्या साधनसामुग्रीचा उपयोग केला तर त्यातूनही उत्पन्न मिळू शकते सावंतवाडी नगरपालिकेने दाखवून दिले आहे
सावंतवाडी येथील नगर पालिकेच्या मोती तलावातून येणाऱ्या माशांमुळे पालिकेच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. चार महिन्यांत तब्बल तीन लाख एवढे उत्पन्न पालिकेला प्राप्त झाले.त्यासाठी पालिकेला कुठल्याही प्रकारचा देखभाल खर्च न करता हे उत्पन्न मिळत आहे.येथील पालिकेकडून पाळणेकोंड धरण आणि आणि मोती तलाव या दोन ठिकाणी तयार होणारे मासे विकले जातात. त्यातून दरवर्षी पालिकेला मोठ्या प्रमाणात उत्पन्न प्राप्त होते. अलिकडच्या काळात पालिकेकडून मोती तलावातील माशांचा ठेका एका एजन्सीला दिला आहे. बांदा येथील स्थानिक एजन्सी तलावातील मासे पकडून ते पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या भागात विकते. यासाठी प्रति किलोमागे ठरलेल्या दराप्रमाणे पालिकेला पैसे भरते. गेल्या पाच महिन्यांमध्ये मोती तलावातील कटला आणि तिलापिया या दोन जातीच्या माशांपासून पालिकेला तब्बल तीन लाख एवढे निव्वळ उत्पन्न मिळाले आहे.
www.konkantoday.com