
निसर्गरम्य चिपळूण; संगमेश्वर फेसबुक गृप आणि संगमरत्न फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय साहित्य वाटपांचा कार्यक्रम संपन्न.
“आनंदाने देऊया समाजाचे देणे” या कार्यक्रमातर्गत दोन्ही सामाजिक संस्थांचा स्तुत्य उपक्रमनिसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुप आणि संगमरत्न फाउंडेशन (NGO) महाराष्ट्र राज्य कडून सोमवार दिनांक १७ जून २०२४ रोजी कळंबस्ते केंद्र मधील आणि काही शाळांमध्ये शालेय वस्तूंचे वाटप कार्यक्रम पाडण्यात आला.या उपक्रमाचे विशेष म्हणजे निवडण्यात आलेल्या पूर्ण शाळा या जिल्हा परिषदच्या शाळा आहेत. संगमरत्न फाउंडेशनचा मुख्य उद्देश हाच आहे की…” आनंदाने देऊया समाजाचं देणं ” याच गोष्टीने प्रभावित होऊन जास्तीत जास्त उपक्रम राबविण्याचे काम फाउंडेशन करून केले जात आहे.या शालेय वस्तूंचे वाटप उपक्रमामध्ये,जिल्हा परिषदेच्या पूर्ण प्राथमिक मराठी शाळा धामापूर,शेनवडे, अंत्रवली केंद्र शाळा,कळंबस्ते केंद्रामधून, वाडावेसराड, तेलेवाडी भीमनगर, कळंबस्ते नं – २ (केंद्रशाळा), उमरे बाईतवाडी, उमरे नंबर -१ या शाळांचा समावेश होता. सदर कार्यक्रमास निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक ग्रुप प्रमुख संदेश जिमन,नितेश मालप विशाल तावडे प्रणय होडे सोबतच संगमरत्न फाउंडेशन(NGO) चे अल्पेश सोलकर, तेजस्वी जावकर,अतुल करपे,प्रशांत आदी पदाधिकारी उपस्थित होते.या उपक्राअंतर्गत शाळा मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग , ग्रामस्थ आदी मंडळींकडून उपक्रमाचे विशेष कौतुक केले जात आहेwww.konkantoday.com