राजापूरचे आमदार राजन साळवी यांना धमकीचा फोन आल्याने जिल्ह्यात खळबळ ,समाजकंटकांचा तातडीने शोध घेऊन कारवाई करावी मंत्री उदय सामंत यांची गृहमंत्र्यांकडे मागणी

राजापूरचे आमदार राजन साळवी यांना धमकी दिल्याच्या प्रकाराने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत साळवी यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना तातडीने पत्र लिहून आमदार साळवी यांना धमकी देणार्या समाजकंटकाचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली आहे
शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांना अज्ञात इसमाने फोन करून ‘रिफायनरी का काम मत रोकना, बुरा हो जाएगा, चल फोन रख’ , असे म्हणत आमदार राजन साळवी यांना व त्यांच्या कुटुंबांना जीवे मारण्याची धमकी दिली
आमदार राजन साळवी हे राजापूरचे शिवसेनेचे आमदार म्हणून २०० ९ सालापासून कार्यरत आहेत. नाणार रिफायनरी प्रकल्पाला स्थानिक जनतेच्या सोबत राहून त्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यांना १० जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ७.३० वाजता ९२६५४४०५७६ या क्रमांकावरुन पहिला फोन आला. यावेळी मोबाईलवरुन अज्ञाताने ‘रिफायनरी का काम मत रोकना, बुरा हो जाएगा, चल फोन रख’ एवढे बोलून फोन बंद केला. त्यानंतर त्याचदिवशी रात्री ११.१४ वाजता परत फोन करुन’ रिफायनरी मे हमारा पैसा लगा हुआ है, अपोज मत करना नही तो तुझे और तेरे परिवार को ठोक देंगे ‘ अशी धमकी देण्यात आली. आमदार साळवी यांना व त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे याबाबत साळवी यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे धमकी देणाऱ्या व्यक्तीचा लवकरच शोध घेण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दरम्यान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी देखील या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे राजन साळवी हे कडवे शिवसैनिक आहेत असल्या फुसक्या धमक्यांना ते घाबरणारे नाहीत आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहोत असेही सामंत यांनी म्हटले आहे दरम्यान मंत्री सामंत यांनी याबाबत गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांना लेखी पत्र पाठवून धमकी देणार्या समाजकंटकाचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी तसेच साळवी यांच्या सुरक्षितेत वाढ करण्यात यावी अशीही मागणी केली आहे आमदार राजन साळवी यांना आलेल्या या धमकीच्या फोनमुळे खळबळ उडाली आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button