रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपदावर जयंत चव्हाण

रत्नागिरी :- रत्नागिरी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर जयंत चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली असून , त्यांनी नुकताच या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे . सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित ताम्हणकर यांनी सर्व मोटार वाहन निरीक्षक , सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक व कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत जयंत चव्हाण यांचे स्वागत केले .
आधीचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर यांची नुकतीच बदली झाल्याने त्यांच्या रिक्त जागी चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे . जयंत चव्हाण यांची परिवहन विभागामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे . जानेवारी २०२१ मध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर पदोन्नतीने बीड येथे त्यांना नियुक्ती देण्यात आली होती . नुकतीच त्यांची बीड येथून उपप्रादेशिक परिवहन कार्यालय , रत्नागिरी या ठिकाणी बदली करण्यात आली आहे .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button