मुंबई महानगरपालिकेच्या ग्राहकांना सेवा देणार्या व्हॉट्स अॅप चॅट बॉट’ या उपक्रमाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
लॉक डाऊन काळात सर्वांनाच सक्तीने घरी बसावे लागले. त्यामुळे वर्षभराच्या कालावधीत विविध दाखले, परवानगीसाठी पालिकेकडे धाव घेणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली. मात्र या सर्व सेवा – सुविधा मुंबईकरांना आता घरबसल्या मिळणार आहेत.जन्म दाखल, विवाह नोंदणी, मालमत्ता कर भरणे, गणेशोत्सव परवानगी आणि तक्रारींच्या निराकरणासह पालिकेच्या ८० सुविधा प्रशासनाने ‘व्हॉट्सअॅप चॅट बॉट’वर उपलब्ध करून दिल्या आहेत. यासाठी ८९९९२२८९९९ हा व्हॉट्सअॅप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पाणीपुरवठा, वाहतूक, रस्ते, पर्जन्य जलवाहिन्या, अशा अनेक प्रकारच्या नागरी सुविधा महापालिकेमार्फत मुंबईकरांना उपलब्ध करून देण्यात येतात. मात्र परवाना, दाखले, शुल्क भराणा अशा अनेक कामांसाठी नागरिकांना प्रभाग कार्यालयात जावे लागते. आता ही सेवा घरबसल्या मिळण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून ‘व्हॉट्स अॅप चॅट बॉट’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा ॲप शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण करण्यात आला.
www.konkantoday.com