भाटीमिऱ्या पारंपरिक मच्छिमाराची निवेदनाद्वारे रत्नागिरीमध्ये सुरु असलेल्या बेकायदेशीर पर्ससीन मासेमारी विरोधात तक्रार
*रत्नागिरी: भाटीमिऱ्या पारंपरिक मच्छीमारी करणाऱ्या मच्छिमारांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी व सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांना एका निवेदनाद्वारे रत्नागिरीमध्ये बेकायदेशीर पर्ससीन मासेमारी विरोधात तक्रार केली आहे.
सदर निवेदनामध्ये पर्ससीन मासेमारी बंदी कालावधीमध्ये कायद्याचे उल्लंघन करून मिरकरवाड्यातील शेकडो नौकां खुलेआम पर्ससीन मासेमारी करीत आहेत. त्यांच्यावर मासेमारी सुधारणा कायद्यान्वये मोठ्या रकमेची दंडात्मक कारवाई करून रोखली जात नाही.
तसेच आता या नौका एलईडी मासेमारी करणेच्या तयारीत असल्याचे निवेदनामध्ये नमूद असून ते मा. जिल्हाधिकारी तसेच रत्नागिरीचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय श्री. भादुले यांना देण्यात आले आहे. सदर निवेदनावर विशाल मुरकर, रणजीत भाटकर, वीरेंद्र नार्वेकर सह अनेक मच्छीमारांच्या सह्या असून, मासेमारी सुधारणा कायदा 2021 मधील दंडात्मक रकमेची कारवाई करून पर्ससीन मासेमारी बंदी कालावधीत खुलेआम सुरु असलेली बेकायदा पर्ससीन मासेमारी रोखली न गेल्यास आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे.
www.konkantoday.com