
क्रेडीट कार्ड व्हेरिफिकेशन करायचे आहे, असे सांगत कार्डचा पीनकाेड विचारून लाखाची ऑनलाईन फसवणूक
आपले क्रेडीट कार्ड व्हेरिफिकेशन करायचे आहे, असे सांगत एका अनोळखी महिलेने तब्बल १ लाख ४ हजार ६१० रुपये काढून घेत फसवणूक केली आहे. संजय मिसाळ (रा. वहाळ घडशेवाडी) असे फसवणूक झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत सावर्डे पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
संजय मिसाळ (५०) याना ९ डिसेंबरला त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात महिलेचा फोन आला. आपले क्रेडीट कार्ड व्हेरिफिकेशनसाठी आले असून ते तत्काळ व्हेरिफिकेशन करावे लागेल असे सांगत क्रेडीट कार्डचा पीन नंबर मागून घेतला. यावेळी मिसाळ यांना आलेला ओटीपीदेखील मागून घेतला.
संजय मिसाळ यांनी त्या महिलेच्या बोलण्यावर विश्वास ठेवून सर्व माहिती दिली. त्या आधारे त्यांच्या खात्यातून १ लाख ४ हजार ६१० रुपये काढण्यात आले. त्यामुळे आपली फसवणूक झाली असल्याची फिर्याद संजय मिसाळ यांनी सावर्डे पोलिसांत दिली आहे. www.konkantoday.com