महिलाही आता कुठच्याही क्षेत्रात मागे नाहीत
पुरुषांच्या बरोबरीने उभ्या राहिलेल्या महिला आता कुठच्याही क्षेत्रात मागे नाहीत
संसाराचा रथ यशस्वीपणे हाकणाऱ्या महिलांच्या हाती कारचं स्टिअरिंग येऊनही जमाना झाला. महिलांच्या ड्राईव्हिंग स्किल्सबद्दल केले जाणारे बाष्फळ विनोद दुर्लक्षित केले, तर अनेक जणी नियमितपणे उत्तम ड्रायव्हिंग करत असल्याचं सगळ्यांनीच पाहिलं आहे. पोलिस दलापासून अन्य क्षेत्रातही महिला मोठ्या प्रमाणावर गाड्यांवर चालक म्हणून काम करीत आहेत नुकत्याच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गाडीचे सारथ्य एका महिला पोलीस चालकाने केले
अशातच आता पुण्यातील एक महिला बस चालवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तुम्ही म्हणाल यात नवल ते काय? तर नवल आहे या माऊलीने दाखवलेल्या प्रसंगावधानाचं. महिलांचा ग्रुप पर्यटन करत असताना बस चालकाला अचानक फिट आली. अशा वेळी योगिता सातव यांनी धीराने बसचे स्टिअरिंग हाती घेतले आणि अनियंत्रित होऊ शकणारी बस तर ताब्यात घेतलीच, शिवाय बस चालकालाही रुग्णालयात दाखल केले.त्यामुळे या महिलेचे कौतुक होत आहे