आरेवारे येथे झीप-लाईन हा साहसी प्रकल्प रत्नदुर्ग माऊंटेनिअरच्या सदस्यांनी खाजगी तत्वावर उभारला
साहसी खेळांचे पर्यटकांना मोठे आकर्षण असते कोकणात येणार्या पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी रत्नदुर्ग माऊंटिनअर्सच्या काही सदस्यांनी पुढाकार घेतला व
त्यातून झिपलाईन हा प्रकल्प साकार होत आहे
ऐंशी ते शंभर फूट उंचावरून दिसणारा निळाशार समुद्र आणि खाडीवरून लहरत जावून मनमोहक निसर्गसौंदर्याचा विहंगम नजारा पाहण्याची संधी आता पर्यटकांना झीप-लाईन या नव्या प्रकल्पामुळे मिळणार आहे. झीप-लाईन हा साहसी प्रकल्प तालुक्यातील आरेवारे येथे रत्नदुर्ग माऊंटेनिअरच्या काही सदस्यांनी खाजगी तत्वावर उभारला आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पर्यटनवृद्धीच्या दृष्टीने टाकलेले हे एक महत्वाचे पाऊल आहे. कोकणसह महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
आरेवारे पूल सोडून पुढे गेल्यानंतर जो चढाव येतो, तेथून ही झीप लाईन टाकून ती सुरू बनापर्यंत आणली जाणार आहे. सुमारे १ हजार ४०० फूट लांबीची आणि ८० फूट उंचीची ही झीपलाईन आहे. या लाईनवर बसवण्यासाठी सुरक्षित रॅक असणार आहे. तेथून पर्यटक लहरत निळाशार समुद्र, किनारा आणि खाडीचे सौंदर्य डोळ्यात साठवून आरेवारे येथील सुरू बनात उतरणार आहे. कोकणात देवगडमध्ये वाळूवरील झीपलाईन आहे. मात्र समुद्रकिनार्यावरील कोकणातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील हा पहिला प्रकल्प आहे.हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर कोकणात येणार्या पर्यटकांना साहसी खेळांचे एक नवे दालन उपलब्ध होणार आहे
www.konkantoday.com