सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत अनेक मोठमोठी लोक अक्कल सांगायला लागली होती, त्यांना आज अक्कल मिळाली असेल -केंद्रीय मंत्री नारायण राणे
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या मुद्द्यावरून राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झालेला कलगीतुरा अद्याप संपायचं नाव घेत नाहीये. या निवडणुकीत भाजपाच्या पॅनलचा विजय झाला असून नारायण राणे यांनी त्यासंदर्भात पत्रकार परिषदेमध्ये सत्ताधारी महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांवर खोचक टीका केली होती.आता पुन्हा एकदा नारायण राणेंनी सत्ताधाऱ्यांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. बँकेच्या अध्यक्षपदी मनीष दळवी आणि उपाध्यक्षपदी अतुल काळसेकर यांची निवड झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
आज भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष -उपाध्यक्ष ११ विरुद्ध ७ मतांनी विजयी झाला आहे.सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत अनेक मोठमोठी लोक आली, अक्कल सांगायला लागली होती, त्यांना आज अक्कल मिळाली असेल.मात्र यापुढे जिल्हा बँकेचा कारभार शेतकरी, गोरगरीब, मजूर, युवा वर्ग, बेरोजगार यांच्यासाठी करायचा आहे
भाजपा चे बँक अध्यक्ष आणि उपाध्यक्ष जनतेच्या हिताचे काम करतील.आज पर्यत सर्व निवडणुका माझ्या नेतूत्वाखाली झाल्या त्यात सर्व अध्यक्षांनी चांगले काम केले मात्र एक अपशकुन झाला, गद्दार निघाला.त्याला आज बँकेतून पळवून लावले आहे.तो जिल्हात उघड मानेने फिरू शकत नाही अशी त्याची अवस्था झालेली आहे.अशी टीका भाजपा नेते केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केली ते जिल्हा बँक अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडी नंतर कार्यकत्यांशी संवाद साधला साधतांना बोलत होते.गोर गरिबांच्या हितासाठी मी जिल्हा बँक या पूर्वी निवडुन आणली होती आणि त्यावर अंकुश ठेवला होता. गद्दार असलेल्या लोकांनी जिल्हा बँकेची बदनामी केली मात्र भाजपा कडून असे काम होणार नाही.जनतेच्या हितासाठी काम केले जाईल
www.konkantoday.com