ठेकेदार, अधिकारी यांची चौकशी करण्याचेआश्वासन,रिक्षामालक-चालक संघटनेचे आंदोलन स्थगित
संगमेश्वर तालुक्यातील कडवई-तुरळ रस्त्याचे निकृष्ट काम व कडवई-चिखली रस्त्याची दुरवस्था या विरोधात रिक्षामालक-चालक संघटना कडवई-तुरळ -चिखली यांच्यावतीने तुरळ येथील उपोषणाची सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल घेतली. ३१ जानेवारीपासून रस्ता दुरूस्ती तसेच ठेकेदार व अधिकारी यांची चौकशी करून अहवाल सादर करून कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर सादर करण्याचे लेखी आश्वासन दिले. संघटनेच्या सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून लेखी आश्वासन दिल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याची माहिती रिक्षा संघटना अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी दिली. www.konkantoday.com