
जि.प.ने प्रत्येक आरोग्य केंद्रात सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवावेत,-वसंत ताम्हणकर
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील फुरूस आरोग्य केंद्रात ५ जानेवारी २०२२ रोजी कोविड-१९ लसीकरण सत्रामध्ये एकूण ६५ लाभार्थीना लसीकरण करण्यात आले. पैकी १५ ते १८ वयोगटातील मुलांचे कोविड-१९ लसीकरण ४९ लाभार्थी तसेच पहिल्या व दुसर्या डोसचे १६ लाभार्थींचे लसीकरण करण्यात आले. या लसीकरणा दरम्यान १५ ते १८ वयोगटातील एका मुलाला डबल डोस दिला गेला अशी बातमी प्रसिद्ध झाली आहे. याबाबत संभ्रम असल्याने जि.प.ने प्रत्येक आरोग्य केंद्रात सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवावेत, अशी मागणी वसंत ताम्हणकर यांनी केली आहे.
www.konkantoday.com