
स्वप्नातही न पाहिलेले स्वप्न…. “एक गांव भुताचा “
स्वप्नातही न पाहिलेले स्वप्न
प्रत्यक्षात पहायला मिळाले अस म्हटल तर वावग ठरणार नाही अस माझ्या बाबतीच नव्हे तर झीटीव्ही वरील ” एक गांव भुताचा ” या सिरियल मधे काम करणार्या कलाकारांना आणि तीची निर्मिती करणार्या प्रत्येकाला वाटत आहे,हो हे अगदी खरच ज्यावेळी पहिल्यांदा वैभव मांगले प्रफुल्ल घाग आणि सुनील बेंडखळे हे माझ्या कड़े सिरियल बाबत बोलायला आले आणि माझ्या नाचणे गावात शुटिंग होणार आणि स्थानिक कलाकारांना संधी मिळणार या कल्पनेचा त्यावेळी मला आनंद झालाच म्हणून मी तातडीने होकार दिला पण तो देताना मला काम मिळेल अस दूरदूरही मनात नव्हत कारण काॅलेज मधे एन एस एस मधे गावात लोकजागृतीकरता आम्ही कलापथक करत होतो तेव्हा काम केल्याचा थोड़ा अनुभव होता पण आज त्यालाही पस्तीस वर्ष होवून गेलेली त्यावेळी आणि आताही पाठांतराच टेन्शन होतच त्यामुळे विचारही मनात नव्हता आणि सर्व शासकीय सोपस्कार पार पाडल्यानंतर गावात शुटिंग सुरू झालही भूमिका ठरलेल्या होत्याच मी जी भूमिका केली आहे ती खरतर माझा मित्र जयु पाखरे (पाली) हां करणार असल्याचे प्रफुल्ल घाग म्हणाला होता मी याच आनंदात होतो कि आपल्या रत्नागिरी मधील कलाकारांना झीटिव्ही वर काम करायला मिळतय हेच मोठ आहे आणि जयु तर खास मित्र आणि अचानक रात्री प्रफुल्ल घाग याचा फोन आला आणि मला म्हणाला उद्या तुला मोजणी अधिकारी म्हणून काम करायच आहे खरतर रात्री झोपच लागली नाही आणि प्रफुल्ल ने तर मला काम करशील का हे सुध्दा विचारल नाही डायरेक्ट उद्या काम कर ! रात्रभर विचार केला सकाळी प्रफुल्ला विचारल अरे डायलाॅग पण तो म्हणाला फार नाहीत तु ये आम्ही बघतो मी काही न बोलता गेलो छाती तर धडधडत होती सीन तयार झाला आणि माझ्या बरोबर विनोद वायगणकर तो ही मित्रच पण शेजारी कोण तर वैभव मांगले सारखा जेष्ठ नट मग काय पण वैभव याने खांद्यावर हाथ टाकला आणि म्हणाला संपाजी नका घाबरू बोला आणि जीवनातील पहिला कॅमेरा समोर आला खरा त्यावेळी तो बंदूकच वाटत होता डायलाॅग वाचले रियलसल केली आणि वाक्य घाटी भाषेतील होती पण ती जमत नव्हती त्याचवेळी वैभव याने जे दोन शब्द सांगितले आणि जरा धीर चेपला ते शब्द होते संपाजी तुम्ही स्क्रिप्ट वाचा तो समजून घ्या आणि तुम्ही तुमच्या भाषेत घ्या हा मंत्र लागू पडला आणि मग तो सहज पूर्णही झाला त्यावेळी सगळ्यांनी संभाळून घेतल त्यामधे निखील पाडावे प्रसाद पिलणकर आणि कोल्हटकर यांनी चांगली साथ दिली दुसर्या शाॅट मोजणीचा होता खरतर तो माझ्या अनुभवात होता पण त्याची तयारी आमचा मित्र आप्पा रणभीसे यांनी चांगली तयारी करून घेतल्यामुळे पहिल्याचवेळी पूर्ण झाला आणि मी कलाकार झालो खरच अगदी स्वप्नातही पाहिल नव्हत अस स्वप्न माझ्या मित्रांनमुळे पूर्ण झाल माझही आणि या युनिट मधल्या सर्वांचच,त्या एका रोलंने फार मोठी प्रसिद्धि मिळाली त्याच एकच उदाहरण सांगतो सिरीयल सुरू झाल्याच्या दुसर्याच दिवशीं मी मासे आणायला मिर्या अलावा ईथे गेलो असता मासे विकणार्या बायकांनी लगेचच माझ्या मित्रांना विचारल कालच्या सिरियल मधे हेच होते ना ? मग मी खाली उतरून गेलो त्यावेळी खुशच झाल्या चांगल झाल काम तुमच खरच त्यांचे ते कौतुकाचे शब्द ऐकले आणि खुप आनंदच झाला माझाच मला अभिमान वाटला. आमच्या वैभव मांगले यांच्या मुळे सगळ्यांचीच न पाहिलेली स्वप्न पूर्ण झालीच.
संतोष सावंत,नाचणे