रत्नागिरी जिल्ह्याला कोणी शिक्षण अधिकारी देता का शिक्षण अधिकारी?
शिक्षण विभागातील प्रमुख पदे रिक्त; प्रभारावर कामकाज सुरू
रत्नागिरी जिल्ह्यात शिक्षण खात्यातील प्रमुख पदे रिक्त आहेत. तत्कालीन शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांची उपसंचालकपदी पदोन्नती झाल्यामुळे माध्यमिक आणि प्राथमिकची पदे रिक्त झाली होती. त्यांच्याजागी कुणाचीही नियुक्ती केलेली नव्हती. जिल्हा परिषद माध्यमिक आणि प्राथमिक विभागातील चार उपशिक्षणाधिकारी पदेही रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षण विभाग सध्या प्रभारी कारभारावर चालत आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा पदभार शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. गजानन पाटील यांच्याकडे तर माध्यमिकचा पदभार कोल्हापूरचे माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्याकडे देण्यात आला आहे. याबाबतचे पत्र नुकतेच जिल्हा परिषदेला प्राप्त झाले आहे. सध्या प्राथमिक शिक्षण विभागातील आठ गटशिक्षणधिकारी पदे रिक्तच आहेत. त्यामुळे प्रशासकीय कामकाज चालवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
www.konkantoday.com