
जनतेचा विश्वासघात केलेल्या नाटकी पुढार्यांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही -रामदास कदम
शिवतेज आरोग्य सेवा संस्थेने शहरातील तलावाजवळील पालिकेची जागा शासनाला सात लाख रुपये देऊन व्यायामशाळा व बहुउद्देशीय सभागृहाच्या उभारणीसाठी २००७ साली घेतली असून त्या जागेची मालकी नगरपालिकेची आहे. त्यामुळे खेड शहरातील जनतचा विश्वासघात केलेल्या नाटकी पुढार्यांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही, असा टोला शिवतेज आरोग्य सेवा संस्थेचे माजी अध्यक्ष तथा शिवसेना नेते रामदास कदम यांनी मंगळवारी खेड येथे पत्रकार परिषदेत घेवून विरोधकांना लगावला आहे.
खेड शहरात शिवतेज आरोग्य सेवा या संस्थेने भूखंड लाटल्याचा आरोप नगराध्यक्ष वैभव खेडेकर व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी नुकतेच लाक्षणिक उपोषण करून केला होता. या आरोपांचा शिवसेना नेते रामदास कदम यांनी जामगे येथील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेवून समाचार घेतला.
www.konkantoday.com