
आंबा घाट रस्ता रोको आंदोलन स्थगित
आंबा घाट रस्ता दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून काम समाधानकारक चालले असल्यामुळे तसेच प्रशासनाने एक पाच सहा दिवस जरी जास्त लागले तरी काम पूर्ण करणार असे सांगितल्याने दिनांक १२ रोजीचे आंबा घाट रस्ता रोको आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे शेतकरी-कष्टकरी संघटनेचे राज्य सरचिटणीस निश्वनाथ किल्लेदार यांनी जाहीर केले आहे.
घाटातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांचे मार्फत चालू असलेले रेटिंनींग वॉल संरक्षण भिंतीचे) काम फारच मंद गतीने चालू आहे, याबाबत अशोक जाधव यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे खड्डे भरणे झाले तरी अवजड वाहने सुरु करणे गरजेचे आहे. किमान २० टनापर्यंतच्या १२, १४ , १६ चाकी रिकामी अवजड वाहने कोल्हापूरकडे जाण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शेतकरी-कष्टकरी संघटनेच्या वतीने अशोक जाधव यांनी केली आहे.
www.konkantoday.com