
शिवसेना आता ऐकणार नाही, त्यामुळे भाजपाने आता उपमुख्यमंत्रीपद घ्यावं आणि शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यावं,-रामदास आठवले
रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपाला मोठा सल्ला दिला आहे. शिवसेना आता ऐकणार नाही, त्यामुळे भाजपाने आता उपमुख्यमंत्रीपद घ्यावं आणि शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यावं, असा सल्ला रामदास आठवले यांनी दिला.यावेळी त्यांनी भाजपाला वाटत होतं की काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देणार नाही. पण भाजपाचा अंदाज चुकला, असंही नमूद केलं. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.
रामदास आठवले म्हणाले, “शिवसेनेचा जो अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला होता त्याप्रमाणे शिवसेना-भाजपाने एकत्र यावं. महाराष्ट्राच्या विकासासाठी त्यांनी प्रयत्न करावा. भाजपाला वाटत होतं की तिन्ही पक्ष एकत्र येणार नाही. आता भाजपाने मोठं मन करावं आणि काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेबाहेर करण्यासाठी मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्याचा विचार करावा.”
www.konkantoday.com