
तिसऱ्या लाटेला आता सुरुवात -आरोग्य मंत्री राजेश टोपे
तिसऱ्या लाटेला आता सुरुवात झाली असून या लाटेचा प्रादुर्भाव कधीपर्यंत राहील हे सांगता येत नाही,पण जानेवारी अखेरपर्यंत ही लाट कायम राहील असा अंदाज राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.राज्यात तिसरी लाट सुरू झालेली आहे. ती आता उच्चांक केव्हा गाठेल ते पाहायचं आहे. आज आपण बघतो आहोत की काल ४५ हजार रुग्ण आढळले, आजही त्यात वाढ होईल. ही वाढ कुठपर्यंत जाईल, केव्हा उच्चांक गाठेल? जसं दुसऱ्या लाटेत दररोज ६५ हजार रुग्ण आढळत होते. तो त्या लाटेचा उच्चांक होता. तसं या तिसऱ्या लाटेचा उच्चांक कोणता आहे? दररोज किती बाधित रुग्ण आढळतील, त्याचा अंदाज बांधणं कठीण आहे. तो कदाचित या महिन्याच्या मध्यापर्यंत किंवा शेवटापर्यंत उच्चांक गाठेल असं वाटतं. त्यानंतर तो खाली जाईल असंही तज्ज्ञांचं मत आहे”.
www.konkantoday.com