रत्नागिरी जिल्हातील जेष्ठ स्व.स्वातंत्र्य सेनानी शिवाजीराव सावंत यांच्या स्मरणार्थ दरवर्षी उत्कृष्ट काम करणार्‍या रत्नागिरी जिल्ह्यातील तहसील कार्यालयाला फिरता चषक देऊन गौरविले जाणार

रत्नागिरी जिह्यातील स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय शिवाजीराव सावंत लांजा सहकारी कुक्कुट व्यावसायिक संस्थेच्यावतीने रत्नागिरी जिह्यातील जे तहसील कार्यालय उत्कृष्ट काम करेल त्यांना ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय शिवाजीराव सावंत गौरव पुरस्कार फिरता चषक प्रदान करण्यात येणार असून हा चषक आज जिल्हाधिकारी बी एन पाटील यांच्याकडे मान्यवरांच्या उपस्थितीत सुपुर्द करण्याचा सोहळा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला
स्वातंत्र्य चळवळीचा अमृत महोत्सवी वर्ष लक्षात घेता या काळची आठवण म्हणून रत्नागिरी जिल्हातील जेष्ठ स्व.स्वातंत्र्य सेनानी शिवाजीराव सावंत यांच्या १९४२ ची स्वातंत्र्य चळवळ, गोवा मुक्तीसंग्राम, मुरुड जंजिरा संग्राम इ. कार्याचा गौरव व्हावा आणि आपल्या इतिहासाची जपणूक करण्यासाठी गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. विवेक सावंत (अध्यक्ष माचाळ पर्यटन संस्था) यांनी मा. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील व उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर यांचे स्वागत केले. त्यानंतर जेष्ठ स्व.स्वातंत्र्य सेनानी शिवाजीराव सावंत यांच्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग व राजकिय कारकिर्द पक्ष उभारणीसाठी संघटानात्मक कार्य, किसान / शेतक-यांसाठीचे कार्य, सहकार चळवळीतील कार्य, कामगार संघटनाविषयक कार्य, शैक्षणिक क्षेत्रातील कार्य इ कार्याबद्दल सर्वांना माहिती दिली.
त्याचप्रमाणे स्व.स्वातंत्र्य सेनानी शिवाजीराव सावंत यांच्या समवेत काम केलेल्या सर्वांनी आप- आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अखेरीस मा. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी स्व.स्वातंत्र्य सेनानी सावंत यांनी जी त्यावेळी मुहुर्तमेढ रोवली त्याची पताका आपणा सर्वांनी पुढे नेऊन हा वारसा जपायला हवा आपले मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे जेष्ठ सल्लागार संचालक मा. भाऊसाहेब वंजारे ,विवेकराव सावंत( अध्यक्ष), राजू धावणे (उपाध्यक्ष), सचिन भिगार्डे संचालक स्वप्ना सावंत, दत्ता कदम (माजी सभापती जि.प), सुजित झिमण (अध्यक्ष रत्नागिरी अर्बन को -ऑपरेटिव्ह बॅंक), सुधाकर सावंत शासकीय कर्मचारी नेते प्रा,आबा सावंत. केशव इंदुलकर अध्यक्ष मराठा मंडळ प्रताप सावंत देसाई सुनिल कुष्टे आदी मान्यवर उपस्थित होते
www.kokantoday.com

विवेक सावंत

जिल्हाधिकारी बी एन पाटील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button