फास्टर बोटीवर कारवाई; बोटीच्या चालकाकडून भर समुद्रात अधिकार्यांना दहशत दाखवण्याचा प्रयत्न
दापोली-शनिवारी मत्स्यव्यवसाय परवाना अधिकारी दिप्ती साळवी व सागरी सुरक्षा रक्षक योगेश तोस्कर यांनी या अत्याधुनिक फास्टर बोटीवर धाडसी कारवाई केली आहे. मात्र याचवेळी या फास्टर बोटी अधिकाऱ्यांसमोरच अन्य फास्टर बोटींनी एकत्र येऊन दहशतयुक्त भिती पसरवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक वृत्त आहे.दरम्यान यावेळी कोणतेही जिल्हा प्रशासनाकडून पोलिस संरक्षणही मत्स्यव्यवसाय पथकाला देण्यात आले नव्हते अशीही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दापोली तालुक्यात दाभोळ बंदरासमोर १८-२० वाव परिसरात मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय नौका ‘जॉन लोरन्स’ IND-KA-01-MM-3328 नौकेला पकडण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. नौकवरील मासळीचा लिलाव करण्यात आला व मासळी रक्कम ३५ हजार ५५० रुपये रक्कम शासन जमा करण्यात आली. गेले काहिदीवस आपली हद्द सोडुन परराज्यातील फास्टर बोटी येऊन मासेमारी करत असल्याच्या तक्रारी स्थानिक मत्स्यव्यवसायिकांककडून होऊ लागली होती.या सगळ्या तक्रारीची गंभीर दखल मत्स्य विभागाकडून घेण्यात आली आहे. मत्स्य विभागाचे पथक या परप्रांतीय बोटी असल्याची खबर मिळाल्याने दाभोळ बंदरापासून सरळ गेले पण परप्रांतीय नौका आहेत हे नेमके लक्षात येत नव्हते.याचवेळी दोन परप्रांतीय नौका फिशिंग करताना दिसल्या. त्यातल्या एका बोटीजवळ हे पथक गेले आणि त्यांना फक्त्त कागद चेक करायांचे आहेत अस सांगितले. त्यामुळे त्यांनी मत्स्य विभागाची बोट त्यांच्या जवळ लावू दिली मग आमचा मत्स्य विभागाच्या बोटीवरील तांडेल आणि सुरक्षा रक्षक त्या परप्रांतीय फास्टर बोटीत गेले. त्यांनी जाळ टाकलं होत त्यामुळे त्यांना काढायला वेळ लागला याचवेळी ती दुसरी नौका लांब जाऊन थांबली वायरलेस ने त्या नौकेने बाजूच्या नौकाना बोलावले व भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पाच सहा बोटी जवळ येण्याचा प्रयत्न करत होत्या. जोरात सायरन लावल्यावर त्या तिथेच थांबल्या.मात्र यावेळी या परप्रांतीय बोटिंनी एकत्र येऊन दहशतयुक्त भीती पसरवण्याचा प्रयत्नकेला. या कारवाईनंतर मत्स्यव्यवसाय विभागाच्या बोटीवरील तांडेल आणि सुरक्षा रक्षकाने बोट दाभोळ बंदरात आणली दाभोळ जेट्टी च काम चालू असल्याने बोट गुहागर तालुक्यातील नवानगर जेट्टीला येथे आणून कारवाईचा पंचनामा करण्यात आला. कर्नाटक मधली बंगळरू मधली ही फास्टर ल बोट आहे. सदर नौकेला दाभोळ बंदरात जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई कामगिरी मा. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली परवाना अधिकारी, दाभोळ दीप्ती आस्वाद साळवी आणि सागरी सुरक्षा रक्षक योगेश तोस्कर यांचा या पथकाने केली.
www.konkantoday.com