
पर्ससीननेट मच्छिमारांचे उपोषण सुरूच
रत्नागिरी : पर्ससीनबाबत राज्य शासनाकडून घेण्यात आलेल्या आडमुठ्या धोरणाविरोधात रत्नागिरी तालुका व जिल्हा पर्ससीननेट मच्छीमार असोसिएशनचे साखळी उपोषण सलग चौथ्या दिवशीही सुरूच आहे. मच्छीमारांनी आता केंद्रीय मंत्र्यांना साकडे घातले आहे. निवेदन केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांना निवेदन पाठवले आहे.
मत्स्य व्यवसाय खात्याने ५ फेब्रुवारी २०१६ च्या शासननिर्णयानुसार नवीन पर्ससीन नियम लागू केले आहेत. त्यात पर्ससीनधारक मच्छीमार १ जानेवारी ते ३१ मे पर्यंत पर्ससीन व्यवसाय राज्य शासनाच्या जलधी क्षेत्रात कायदेशीरपणे चालू ठेवू शकत नाहीत. अवघे चार महिने पर्ससीननेटला परवानगी दिली असून आठ महिने त्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे पर्ससीनधारक मच्छीमारांना उद्ध्वस्त झाले आहेत, असे पर्सिसन नेट मच्छीमारांचे मत आहे.आज या मच्छीमार नेत्यांनी उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली त्यावेळी त्यांनी मच्छिमार मंडळाच्या शिष्टमंडळाची व मत्स्य खात्याच्या मंत्र्यांची भेट घडवून देण्याचे आश्वासन दिले
www.konkantoday.com