
समुद्रामध्ये उद्भवलेल्या मासळी दुष्काळामुळे बहुतांशी नौका हर्णै बंदरात उभ्या
समुद्रामध्ये उद्भवलेल्या मासळी दुष्काळामुळे २० ते २५ दिवस बहुतांशी नौका हर्णै बंदरात आणि आंजर्ले खाडीत नांगर टाकून आहेत. मासेमारीला गेलेल्या काही मच्छीमारांना हात हलवत परत यावे लागले आहे.यामुळे मच्छीमार निराश झाले आहे. मासळी मिळण्यासाठी हर्णै बंदरात सालाबादप्रमाणे मच्छीमारांनी समुद्राची पूजा करून मासळीसाठी देवाकडे साकडे घातले.
मासळी हंगामाच्या सुरवातीपासूनच अनेक छोट्या-मोठ्या वादळांमुळे मासेमारी संकटात सापडली आहे. ऑक्टोबरपासून मासळी चांगल्याप्रकारे मिळू लागली होती. गेले दोन महिने मासळीची आवक चांगली होती. परंतु गेले महिनाभर परराज्यातील फास्टर इंजिनच्या नौकांनी हर्णै परिसरातील समुद्रात धुमाकूळ घातला आहे. वेळेला करोडो रुपयांची मासळी एक नौका नेत आहे. रोजच्या १०० ते २०० नौका या भागात असतात. त्यामुळे गेले २० ते २५ दिवस मासळीच मिळत नाही. त्यामुळे आता दुष्काळाचे संकट येऊन ठेपले आहे.
www.konkantoday.com