
नियम पाळा अन्यथा लॉकडाऊन करावा लागेल : खासदार विनायक राऊत
रत्नागिरी : नागरिकांनी कोरोना निर्बंधाचे पालन करावे अन्यथा लॉकडाऊनसारखे कठोर पाऊल प्रशासनाला उचलावे लागेल, असे खा. विनायक राऊत यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) बैठक खासदार विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात पार पडली. यावेळी खा. राऊत बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव, सर्व तालुका पंचायत समिती सभापती, सर्व नगराध्यक्ष व सदस्य दूरदृष्य प्रणालीद्वारे तर जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर तसेच संबधित विभागाचे अधिकारी व सदस्य प्रत्यक्ष उपस्थित होते. जिल्ह्यातील रुग्णांमध्ये असणारी आरोग्य यंत्रणेची तयारी याबाबत त्यांनी माहिती घेतली.
पाणी पुरवठ्या संदर्भातील योजनांचे काम तत्काळ मार्गी लावा, अशा सूचनाही खा. राऊत यांनी अधिकार्यांना दिल्या.
www.konkantoday.com